
ishetkari App .com .in
Gharkul Yojana Anudan : PM घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ! जाणून घ्या नवीन रक्कम आणि संपूर्ण माहिती
Gharkul Yojana Anudan: पंतप्रधान ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना सध्या १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या सात वर्षांपासून या अनुदानात कोणतीही वाढ झालेली नाही, अशी अनेक लाभार्थ्यांची तक्रार होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे गृहनिर्माणासाठी मिळणाऱ्या मदतीत वाढ होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. ही योजना देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण योजनांपैकी एक आहे. मागील ४५ दिवसांत १००% घरांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी जवळपास १० लाख ३४ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित १० लाख घरांसाठी देखील लवकरच पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
या सर्व प्रक्रियेसोबतच वर्षभरात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे.
Gharkul Yojana Anudan
राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत अनेक वेळा नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधी वेळोवेळी या अनुदानात वाढ करण्याची मागणी करत होते. सध्या राज्यात २० लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे आणि पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या अनुदानात घरकुलांची कामे पूर्ण करणे कठीण जात असल्याने अनेक कामे अर्धवट राहतात. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडथळे येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी अर्थसंकल्पात यासाठी आवश्यक तरतूद केली जाणार असून लवकरच यासंदर्भात घोषणा होईल. विशेषतः ज्या लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी स्वतःची जागा नाही, त्यांना ५० हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, शबरी आवास योजनेअंतर्गत २.५ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत अनुदान वाढवून २.१० लाखांपर्यंत करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.